Loading

The Hobbit

द हॉबिट

Author : J. R. R. Tolkien, Trans. Mugdha Karnik (जे. आर. आर. टॉल्कीन, अनुवाद : मीना किणीकर)

Price: 495  ₹396

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788184833744
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Hardcover
Edition : 0
Language : Marathi
Rating :

‘द हॉबिट’ ही आधुनिक साहित्यातील अभिजात कादंबरी आणि ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ कादंबरीचा पूर्वरंग. बिल्बोनं दारासारख्या खिंडारातून पुन्हा एकदा डोकावून पाहिलं तेव्हा, स्मॉग नक्कीच गाढ झोपल्यासारखा दिसत होता. तो पुढे जमिनीवर पाऊल टाकणार तोच, स्मॉगच्या डाव्या डोळ्याच्या लोंबणार्‍या पापणीखालून बाहेर पडणारा बारीक आणि तीक्ष्ण, तांबडा किरण त्याला दिसला. तर हा झोपण्याचं नुसतं ढोंग करतोय ! त्याचं लक्ष भुयाराच्या खिंडाराकडे होतं... बॅग एन्ड येथील त्याच्या हॉबिट-बिळातील सुखासीन आणि फारशा महत्त्वाकांक्षा नसलेल्या आयुष्यातून विझार्ड गँडाल्फ आणि ड्वार्फ्सच्या गँगने हुसकावून लावल्यावर, बिल्बो बॅगीन्स एका प्रचंड मोठ्या आणि अतिशय धोकादायक अशा स्मॉग द मॅग्निफिसन्ट, ड्रॅगनच्या खजिन्यावर हल्ला करायच्या योजनेत सामील होतो. या मोहिमेत सहभागी होण्यास बिल्बो जरी आधी अतिशय नाखूष असला तरी नंतर स्वत:च्याच युक्तिबाजपणाने आणि चोरटेपणाच्या कौशल्याने तो स्वत:च आश्चर्यचकित होतो ! ही कादंबरी जे.आर.आर. टॉल्कीन यांनी स्वत:च्या मुलांसाठी लिहिली होती. १९३७ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीच्या प्रथम प्रकाशनाला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९९७ साली ऍलन ली यांनी काढलेल्या रेखाटनांनी चित्ररूप केलेली ही आवृत्ती प्रकाशित झाली. ही कादंबरी ‘या पिढीतील अत्यंत प्रभावशाली पुस्तकांमध्ये गणली जाते.’ द टाइम्स

Be the first to review


Add a review