Loading

PRAKASHACHI SAVALI

प्रकाशाची सावली

Author : Dinkar Joshi (स्मिता भागवत )

Price: 340  ₹306

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789394258495
Publisher : Mehta Publishing House
Published on : 2022
Binding type : Paperback
Edition : 4
Language : Marathi
Rating :

बा-बापूंसाठी आफ्रिकेतून हरिलाल हिंदुस्तानात येतात. गुलाबसारखी संस्कारी पत्नी व तीन मुलांच्या सहवासात ते उत्तम आयुष्य जगतात. आश्रमातील कार्यात बापूंना मदत करतात. बॅरिस्टर पदवी मिळवायचीच, या ध्येयाने प्रेरित होतात. पण बापूंना हे मान्य नसते. ही अढी त्यांना आश्रम सोडण्यास भाग पाडते. इतर भावंडंही शिक्षणापासून वंचितच असतात. हरिलालना हा अन्याय सहन होत नाही. बाहेर पडल्यावर शिक्षण, व्यवसाय-नोकरीतल्या अपयशाने ते खचून जातात. भटके जीवन, कुटुंबाची काळजी, व्यसने, वेश्यागमन, छंदीफंदी मित्र यांच्यात ते वाहवत जातात. मुस्लीम धर्म स्वीकारून बापूंविरोधात लेख लिहतात. पत्नीचे व बांचे निधन होते. राष्ट्रकार्यात बापूंवर गोळीबार होतो. बापूंच्या निधनानंतर काही महिन्यांतच राष्ट्रपित्याच्या या मुलाचा दुर्दैवी अंत होतो. शेवटी शवागारातील दारवान ओळख पटवून देण्यासाठी विचारतो, ‘’आठ नंबर का मुर्दा आपका है क्या साब?’’ राष्ट्रपित्याच्या मुलाची ही शेवटची ओळख अंगावर शहारा आणते.

Be the first to review


Add a review