Loading

The Strange Case of Dr. Jekyll and Mr Hyde

द स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड

Author : Robert Louis Stevenson (रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन, अनु. सोनाली नवांगुळ )

Price: 125  ₹112.5

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789391948351
Publisher : Diamond Publications
Published on : 2021
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

‘‘माणसाची ओळख जसजशी पटत जाते, तसतसे सगळेच सुष्ट-दुष्ट वृत्तींच्या अनोख्या मिश्रणातून उगवलेले आहेत, हे कळत जाते...’’ अटरसन वकील दूरच्या नात्यातल्या एनफिल्ड यांच्यासोबत लंडनच्या गल्ल्यांमधून फेरफटका मारत असतात. तेव्हा एनफिल्ड काही महिन्यांपूर्वी स्वत: अनुभवलेल्या एका बीभत्स घटनेविषयी त्यांना सांगतात. ही गोष्ट असते, बघताच भीती वाटावी अशा मि. हाईडची! हा हाईड एका लहान मुलीला आधी निर्दयपणे तुडवतो आणि मग एका गूढ घराच्या दारामागे गुप्त होतो. काही क्षणानंतर मुलीच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई म्हणून द्यायच्या रकमेचा चेक घेऊन अवतरतो. त्या चेकवर एका अत्यंत प्रतिष्ठित सद्गृहस्थाची सही असते. पुढे कळतं, हा प्रतिष्ठित माणूस म्हणजे दुसरा-तिसरा कुणी नव्हे, तर अटरसन यांचा एक जुना मित्र आणि अशीलही असणारा डॉ. जेकिल असतो. मग मि. हाईड कोण? डॉ. जेकिल कोण? या दोघांना जोडणारं काही रहस्य तर नसेल? काही गूढ... रॉबर्ट स्टीव्हन्सनची अतिशय झपाटून टाकणारी ही गोष्ट वाचकांना गोंधळात टाकणारं एक कोडं घालते आणि शेवटी रहस्यावरचा पडदा उघडते. चांगल्या-वाइटाची अभिजात म्हणावी अशी ही भयकथा एकोणिसाव्या शतकातल्या मूलभूत विरोधाभासाविषयी भाष्य करते. बाहेरून प्रतिष्ठेची आणि आतून तीव्र लालसेची आस असणार्‍या माणसामधल्या विरोधाभासाचं चित्रण करणारी, ‘व्हिक्टोरियन एरा’मधलं अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शी लेखन मानली जाणारी ही लघुकादंबरी इंग्रजी वाङ्मयातली ‘वाचकप्रिय कादंबरी’ म्हणून आपलं स्थान आजही राखून आहे.

Be the first to review


Add a review