Loading

Afgan Diary : kaal ani aaj

अफगाण डायरी : काल आणि आज

Author : Pratibha Ranade (प्रतिभा रानडे     )

Price: 350  ₹315

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : : 9788174342287
Publisher : Rajhans Prakashan
Published on : 2010
Binding type : Paperback
Edition :
Language : Marathi
Rating :

ऋग्वेदातील ऋचा रचल्या गेल्या त्या अफगाणिस्तानातील अमू नदीच्या काठी. पारश्यांचा धर्मग्रंथ अवेस्ता हा देखील झरतुष्ट्राने इथेच लिहिला. त्यानंतर इथल्या पर्वतपहाडांच्या द-याखो-यांतून ‘बुद्धं सरणं गच्छामि’चे सुर निनादले. आज त्याच प्रदेशात अल काईदाचे वेगळ्याच प्रकारचे साहित्य सापडले आहे - सर्व त-हेची विध्वंसक कृत्ये करण्याचे पद्धतशीर शिक्षण देणारे साहित्य. मुळात हा प्रदेश होता अश्र्वगणस्थान. काळाच्या ओघात तो झाला अफगाणिस्तान. १९७९ च्या अखेरीस रशियन सैन्य अफगाणिस्तानात घुसले तेव्हा संतापलेल्या सर्वसामान्य अफगाणांनी चिडून म्हटले होते, आज आमचे अफगाणिस्तान मेले. आता आमच्या देशाचे नाव ठेवायसा हवे. ‘शोहखीस्तान’. त्यानंतर २४ वर्षांच्या युद्धामुळे पूर्णपणाने पिळवटून निघालेले, भांबावलेले, संतापलेले सर्वसामान्य अफगाण भविष्याकडे आशेने नजर लावून बसले आहेत. पण तिथे सरकार स्थिर राहू नये, शांतता नांदू नये म्हणून प्रयत्न करणा-या, आपले स्वार्थ जपणा-या अंतर्गत शक्ति आहेत, बाहेरच्या शक्तिही आहेतच. जर तिथे शांतता स्थापन झाली नाही, तर पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडणार आहे. एका बाजूला जगातील इस्लामेतर शक्ति आणि सत्तांचा विध्वंस करायला सज्ज झालेला दहशतवाद आहे; तर दुस-या बाजूला जगावर निरंकुश सत्ता गाजवायला सिद्घ झालेल्या पाश्चात्य साम्राज्यवादाचा म्होरक्य – बलिष्ट अमेरिका आहे. या जात्यात आज अफगाणिस्तान भरडून निघाला आहे, तर इतर देश सुपात आहेत. इतिहासाच्या या स्तिमित करणा-या वाटचालीचा वेध घेणारे पुस्तक

Be the first to review


Add a review