Loading

Don’t loose your mind loose your weight

डोंट लूझ युर माइंड लूझ युर वेट

Author : Rujuta Diwekar (ऋजुता दिवेकर)

Price: 199  ₹179.1

Discount: 10%

Avilability: Out of stock

ISBN : 0
Publisher : Ameya Inspiring Books
Published on : 2009
Binding type : Paperback
Edition : 3
Language : Marathi
Rating :

‘डाएट’ हा शब्द आजकाल - झपाट्यानं घटणारं वजन, खालावणारी प्रकृती, कमी होणारा उत्साह, बिघडणारं शारीरिक संतुलन आणि या सगळ्यांवर कडी म्हणजे सारासार विवेकाचं सुटत जाणारं भान- अशा भीतिदायक विचारांशी घट्ट जोडला गेला आहे. थोडक्यात सांगायचं तर ‘डाएट’ हा शब्द कोणाही विचारी माणसानं उच्चारू नये असा अपशब्द झाला आहे. तुमचं डाएट- म्हणजे तुमचा आहार हा कसा तुम्ही आयुष्यभर जे आनंदानं खाऊ शकाल, त्याच्याशी जुळणारा असला पाहिजे. तुमच्या मूळ प्रकृतीशी, आवडी-निवडींशी, तुमच्या सवयींशी, कामाच्या स्वरूपाशी त्याचा मेळ साधला गेला पाहिजे. तसं झालं तरच तुमचं डाएट तुमच्या बाबतीत तुम्हाला हवा तो ‘चमत्कार’ घडवू शकतं. ‘डाएट’ करण्यामागे फक्त वजन कमी करणं एवढाच मर्यादित उद्देश ठेवणं योग्य नाही. वजन- खरं तर चरबी- कमी करणं हा डाएटचा केवळ एकच चांगला परिणाम बहुतेकांना माहीत असतो; पण डाएट करण्याचे अन् त्या निमित्तानं आपली जीवनशैली बदलण्याचे अनेक फायदे असतात, हे त्यांना माहीत नसतं. ज्या डाएटचा उद्देश फक्त वजन कमी करणं हा असतो, ते डाएट फसलंच म्हणून समजा. हे म्हणजे चार दिवस एखाद्या खडतर परिक्रमेवर गेल्यासारखं आहे. बहुतेक डाएट्समध्ये इतके टोकाचे प्रकार सांगितलेले असतात की, ती डाएट्स पाळणं अशक्यच होतं; शिवाय त्यांचा तुमच्या शरीरावर आणि मनावर दुष्परिणाम होतो. तुमचं शरीर, अन्न आणि खाण्याची क्रिया यांकडे बघण्याची वेगळी दृष्टी हे पुस्तक तुम्हाला देईल. योग्य आहार आणि योग्य वेळी खाणं. चरबी आपोआप कमी होते हे लक्षात ठेवा. एकदा का समजायला आणि आचरणात आणायला सोपी असलेली तत्त्वं तुम्ही पाळू लागलात की, दोन आठवड्यातच त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील. खाण्याविषयीची तुमची आंतरिक जाणीव अधिक वाढेल. तुम्हाला झोप अधिक चांगली लागायला लागेल आणि अधिक उत्साही वाटायला लागेल. साधारण तीन महिन्यांत इतर दृश्य परिणाम दिसायला, घरातील कपडे सैल व्हायला लागतील. आपण आपोआपच अति खात नाही आहोत, कधी काय खावं ते आपल्याला नेमकं कळायला लागलं आहे, असं लक्षात येईल. एक प्रकारचा शांतपणा अनुभवायला येईल आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वजनाची चिंता करणं बंद झालंय असंही लक्षात येईल.

Be the first to review


Add a review