Loading

Goshta Paishapanyachi

गोष्ट पैशापाण्याची

Author : Prafulla Wankhede (प्रफुल्ल वानखेडे )

Price: 299  ₹239.2

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 0
Publisher : Sakal Prakashan
Published on : 2022
Binding type : Perfect
Edition : 1
Language : Marathi
Rating :

** पुस्तक ९ ऑक्टोबर रोजी प्रकाशित होत आहे. आपली बुद्धी असो की पैसा योग्य ठिकाणी वापरले तरच त्याला किंमत. तसाच मूल्ये यांचा प्रगतीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे पैसा, मूल्ये आणि त्याबरोबर होणारी कृती योग्य दिशेने राहिली तर आपल्याला अग्रेसर राहण्याचे गणित जुळविता येते. त्यातून जीवनात ठरवलेली ध्येयं गाठता येतात. त्यादृष्टीने आपल्याजवळ असलेल्या या गोष्टींचे योग्य कृतीमध्ये रुपांतर करण्यासाठी हे पुस्तक अतिशय मार्गदर्शक ठरणारे आहे. नव्या संधी, अर्थसाक्षरता, हार्डवर्क आणि स्मार्टवर्कचे महत्त्व, संभाव्य संकंटांचा वेळीच वेध, गुंतवणूक, बचतीचे धोरण आणि या सर्वांपलीकडे व्यवहारकुशलता महत्त्वाची ठरते. त्यासाठी हे पुस्तक दिशादर्शक आहे. प्रफुल्ल वानखेडे हे अनेक कंपन्यांचे संस्थांपक-अध्यक्ष आहेत. ते पुस्तकप्रेमी आहेत. वाचनसंस्कृती जोपासणे आणि वाढविणे यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. ट्विटरवर त्यांचे असंख्य युथ फालोअर्स आहेत. अनोख्या पद्धतीने मूल्ये जपून व्यावसायिक यश मिळविण्याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता ते मुख्यत: ओळखले जातात. या पुस्तकाच्या लेखांमधून त्यांनी स्वत:ला आलेल्या अनुभवांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यांना भेटलेल्या माणसांकडून, त्यांनी वाचलेल्या पुस्तकांमधून त्यांनी स्वत: कोणती कौशल्ये आणि गुण आत्मसात केली आहेत, हे त्यांनी यामध्ये उलगडले आहे. प्रफुल्ल वानखेडे यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या शब्दांमध्ये विविध विषयांवर प्रकाश टाकला आहे. प्रगतीमध्ये इमोशनल आणि इंटेलिजेंट कोशंट महत्त्वाचा असल्याचे मत अनेकजण मांडतात. मात्र, फायनांशिअल कोशंटशिवाय हे सर्व व्यर्थ असल्याचे मत त्यांनी मांडून अभ्यासाची एक नवी दिशा खुली केली आहे आणि पैशापाण्याच्या गोष्टींना नवा आयाम मिळवून दिला आहे.

Be the first to review


Add a review