Loading

Bharatiya Sansadechi Karyapaddhati

भारतीय संसदेची कार्यपद्धती

Author : Lakshman Shinde (लक्ष्मण शिंदे )

Price: 350  ₹280

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9789391948597
Publisher : Diamond Publications
Published on : 2022
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

आपल्या देशाच्या संविधानाने भारतीय संसदेस नवीन कायदे बनविणे आणि वर्तमान कायद्यांमध्ये आवश्यक बदल करणे, किंवा अनावश्यक कायद्यांना समाप्त करण्याबरोबरच देशातील केंद्र सरकारच्या कामकाजाची समीक्षा करणे, आणि जबाबदारी निर्धारित करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. संसद सदस्य हे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध प्रक्रियांच्या माध्यमातून चर्चेमध्ये भाग घेतात. त्याचबरोबर संसद सदस्य सरकारी कामकाजावर आणि देशातील ज्वलंत समस्यांवर प्रश्न विचारून त्या समस्यांचे समाधान कसे केले जाईल याचाही विचार करतात. संसदेत होणार्‍या विविध चर्चा या संसदेद्वारा निर्धारित विविध नियम आणि व्यवस्थांच्या अंतर्गत केल्या जातात. लेखकाने या पुस्तकामध्ये भारतीय संसदेच्या बहुउद्देशिय कामकाजाची संविधानिक व्यवस्था, नियम आणि परंपरांच्या जटिल आणि विस्तृत विषयाला संक्षेपी आणि सरळ भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर लेखकाने भारतातील संसदीय लोकतांत्रिक परंपरा आणि व्यवस्थांच्या विकासाचा संक्षिप्त इतिहास, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, राज्यसभेचे सभापती आणि लोकसभाध्यक्ष यांची निवडणूक आणि त्यांचे अधिकार क्षेत्र आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली आहे. देशाचा सामान्य माणूस आपले म्हणणे, आपल्या सूचना कशा पद्धतीने थेट संसदेपर्यंत पाठवू शकतो यावर संविधान आणि संसदीय व्यवस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रक्रियांचे वर्णन केले आहे. समाज माध्यमांच्या (डेलळरश्र चशवळर)२४ तास होणार्‍या प्रसारणांमध्ये भारतीय संसदेच्या कामकाजावर सामान्य नागरिक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात, याचासुद्धा आढावा घेतला आहे. राज्यशास्त्र आणि अन्य संबंधित विषयांचे विद्यार्थी विशेषत: स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही संग्रहित माहिती विशेष उपयोगी सिद्ध होईल.

Be the first to review


Add a review