Loading

Jevha ashiya mhanjech jag hota

जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं

Author : Dr Stewert Gordon, Trans. Ravindra Kulkarni (डॉ. स्टुअर्ट गॉर्डन, अनु. र. कृ. कुलकर्णी)

Price: 299  ₹239.2

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788195290802
Publisher : Diamond Publications
Published on : 2021
Binding type : Paperback
Edition : 11
Language : Marathi
Rating :

"इ. स. ५०० ते १५०० या कालखंडात आशिया हा विस्मयजनक, एकसंध आणि नवनव्या शोधांनी गजबजलेला प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठी पाच शहरे आशियात होती आणि ती शहरे पाच मोठ्या साम्राज्यांच्या केंद्रस्थानी होती. याच आशियातील गणितींनी शून्य आणि बीजगणित यांचा शोध लावला. येथील खगोलशास्त्रज्ञांनी ग्रह-तार्‍यांचा अधिक अचूक वेध घेताना नौकानयनासाठी उपयुक्त वेधयंत्राचा ( Astrolabe ) शोध लावला. याच काळात आशियातील साहित्यनिर्मितीही नवनिर्मितीच्या अत्युच्च शिखरावर होती. आज घडीलादेखील आपला प्रभाव कायम असलेल्या विचारधारांचा उगम याच काळात झाला आणि तत्त्ववेत्त्यांनी प्रभावी कायद्यांची रचनादेखील याच काळात केली. या कालखंडात जीवन व्यतीत केलेल्या माणसांच्या स्मृतिग्रंथांवर या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आधारित आहे. ह्या निर्भीड आणि साहसी माणसांनी समुद्र-सफरी केल्या, वाळवंटे तुडवली आणि सर्वोच्च पर्वतांची शिखरे सर केली. दक्षिण रशियातील बुल्गर ते आग्नेय आशियातील बुगी अशा वैविध्यपूर्ण जमातींमधील लोकांबरोबर, आपल्याला अवगत नसलेल्या भाषांमधून व्यवहार करण्याची किमया आशियातील या लोकांनी साध्य केली होती. त्यांचे स्मृतिग्रंथ वाचताना आपल्यालाही त्यांच्या तांड्यांबरोबर आणि जहाजांबरोबर प्रवास केल्याचा अनुभव येतो; त्यांनी सहन केलेली रक्त गोठवणारी थंडी आणि त्यांचा थकवा यांचा जणू आपल्यालाही प्रत्यय येतो; त्यांच्या आशाआकांक्षांचे आणि मनातील भीतीचे आपण साक्षीदार होतो आणि या मध्ययुगीन महान आशियाई जगताच्या श्रीमंतीने आणि आश्चर्यकारक प्रगतीने आपण थक्क होऊन जातो."

Be the first to review


Add a review