Loading

Vyavasayik Samajkarya

व्यावसायिक समाजकार्य (शिक्षण व व्यवसाय)

Author : Dr. Devanand Shinde (डॉ.देवानंद शिंदे)

Price: 350  ₹280

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788184834680
Publisher : Diamond Publications
Published on : 2012
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

प्रस्तुत पुस्तक समाजकार्य व्यवसायाचे शिक्षण घेणार्‍या व घेतलेल्या समाज-कार्यकर्त्यांसाठी खर्‍या अर्थाने मार्गदर्शक ठरणार आहे. १. आधुनिक दृष्टिकोन, तंत्रे व आजच्या परिस्थितीत समाजकार्याची वाटचाल (अगदी जून २०१० हॉंगकॉंग येथे पार पडलेल्या समाजकार्य शिक्षक, धोरणकर्ते व कार्यकर्त्यांच्या जागतिक परिषदेपर्यंत) कशी असायला हवी यासंबंधीचा आढावा. २. समाजकार्य शिक्षणाच्या अनुषंगाने स्थानिक ते जागतिक पातळीवरील समाजकार्य शिक्षणाचा आढावा. ३. समाजकार्य शिक्षणातील पारंपरिक दृष्टिकोनाबरोबरच आधुनिक दृष्टिकोनाचा समावेश. ४. समाजकार्य शिक्षणाचा अविभाज्य भाग असलेल्या क्षेत्रकार्यातील अनौपचारिकता घालवून त्यात अधिक औपचारिकता आणण्यासाठी नवीन काही तंत्रांचा (जसे KRA, Zero Pendency) समाजकार्य शिक्षणात अगदी नव्यानेच समावेश. ५. ‘समाजकार्य व्यवसाय’ हा विषय देशातील, विशेषत: महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांत ‘मूलभूत विषय’ असल्याने विद्यार्थ्यांना सहज तसेच अधिक आकलन होण्यासाठी पुस्तकामध्ये विविध संकल्पना अधिक स्पष्ट करण्याचा व किमान एक तरी व्याख्या इंग्रजीमध्ये जाणीवपूर्वक देण्याचा प्रयत्न. ६. समाजकार्य : एका दृष्टिक्षेपात हे विशेष प्रकरण. ७. पुस्तकाच्या शेवटी दिलेले नमुनाप्रश्‍न, महत्त्वाच्या शब्दांचा अर्थ व संदर्भसूची यामुळे हे पुस्तक वाचकांस सहज वाचनीय ठरेल अशी आशा आहे.

Be the first to review


Add a review