Loading

Loksankhyashastra

लोकसंख्याशास्त्र

Author : Dr. Avinash Kulkarni (डॉ. अविनाश कुलकर्णी)

Price: 250  ₹200

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9789386401700
Publisher : Diamond Publications
Published on : 2019
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून लोकसंख्याशास्त्र या विषयाच्या विविध संकल्पनांच्या व्याख्या आणि अर्थ यांचे सदर पुस्तकात विवेचन केले आहे. तसेच या विषयाचे स्वरूप, व्याप्ती, अभ्यासाची आवश्यकता व महत्त्व अधोरेखित केले आहे. प्रस्तुत विषयाशी संबंधित अभिजात व नव-अभिजात विचारवंतांनी मांडलेले सिद्धान्त, विचार आणि त्यांच्या मर्यादा यांचा ऊहापोह या पुस्तकात केला आहे. लोकसंख्येची रचना व विभागणी यांच्यावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती या पुस्तकात दिली आहे. विशेषतः जनन, मर्त्यता यांच्यातील कल (trends) यांबाबत जागतिक व भारतीय संदर्भातील सांख्यिकीय माहिती, तक्ते व आलेख-आकृत्यांद्वारे मांडली आहे. लोकसंख्येची लिंग संरचना, वयोगटानुसार रचना, व्यवसायानुसार विभागणी, भाषावार व धर्मानुसार विभागणी इ.ची सांख्यिकीय माहिती तक्त्यांद्वारे देऊन विश्लेषण केले आहे. लोकसंख्या आणि विविध सामाजिक प्रवाह यांची चर्चा करण्यासाठी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून उपयोग करून स्थलांतर, नागरीकरण, पर्यावरण, लोकसंख्या धोरण, मत व बालकल्याण धोरण इ.ची माहिती अंतर्भूत केली आहे. लोकसंख्या विषयातील आधुनिक प्रवाह उदा. लोकसंख्या त्रिमितीस्तंभ (Pyramid), लोकसंख्या प्रक्षेपण पद्धती (projection) इ.चाही समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. समाजशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात 'लोकसंख्याशास्त्र' अथवा 'लोकसंख्या शिक्षण' या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर एम.फील., पी.एचडी. व प्रगत संशोधन करणाऱ्या अभ्यासकांसाठीदेखील हे पुस्तक एक संदर्भग्रंथ म्हणून अतिशय उपयुक्त आहे.

Be the first to review


Add a review