Loading

Maza Talamay Jeevan - Zakir Hussain

माझं तालमय जीवन : झाकीर हुसेन

Author : नसरीन मुन्नी कबीर (नसरीन मुन्नी कबीर, अनु. प्रणव सखदेव)

Price: 295  ₹265.5

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386493507
Publisher : Rohan Prakashan
Published on : 2018
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ झाकीर हुसेन हे जागतिक पातळीवरचं ख्यातकीर्त व्यक्तिमत्त्व. उस्ताद अल्लारखॉँ यांचे सर्वांत मोठे सुपुत्र. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केलं आणि त्यानंतर ते संगीत क्षेत्रातला ‘चमत्कार’ समजले गेले! त्यानंतर कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी तसंच नर्तकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार झाले. याबरोबरच झाकीर यांनी आपल्या सर्जकतेतून जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसंच एकलवादनही केलं. जॉन मॅव्âलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्यासोबत त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. नसरीन मुन्नी कबीर यांनी झाकीर हुसेन यांच्याशी साधलेल्या या प्रदीर्घ संवादात आपण झाकीर यांची जीवनकहाणी त्यांच्याच तोंडून ऐकतो. त्यांचं बालपण कसं होतं, माहीममध्ये त्यांनी व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, असामान्य प्रतिभेच्या वडिलांकडून त्यांनी वयाच्या चवथ्या वर्षापासून घेतलेले तबलावादनाचे धडे, पं. रवी शंकर, उस्ताद अली अकबरखॉँ आणि उस्ताद विलायतखॉँ यांसारख्या प्रतिभावंतांसोबत काम करताना आलेले अनुभव, आठवणी आणि किस्से यांतून संगीताचं अनोखं विश्व आपल्यासमोर येतं. यात झाकीर आपल्याला त्यांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान, संगीताबद्दलची त्यांची समज, गुरू-शिष्य नातं आणि तबलावादनावर असलेलं त्यांचं निस्सीम प्रेम याबद्दल कधी मिश्किलपणे तर कधी समर्पित भावनेने बोलतात. एक विख्यात कलावंत म्हणून अमेरीका व भारत या दोन्ही देशांत आयुष्य व्यतीत करण्याची कसरत त्यांनी कशी साधली आहे याविषयीही ते मोकळेपणाने सांगतात.

Be the first to review


Add a review