Loading

Madurai Te Uzbekistan

मदुराई ते उझबेकिस्तान

Author : Shreenath Perur, Trans. Ulka Raut (श्रीनाथ पेरूर, अनु. उल्का राऊत)

Price: 240  ₹216

Discount: 10%

Avilability: In stock

ISBN : 9789386493446
Publisher : Rohan Prakashan
Published on : 2018
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

‘कन्डक्टेड टुर्स’मधून प्रवास करणं म्हणजे भोज्जास हात लावून येणं...असा एक सर्वसाधारण समज ! या पुस्तकाचा लेखक श्रीनाथ पेरुर याने अशा प्रकारच्या टुर्सचं अंतरंग समजून घेण्यासाठी देश-विदेशातल्या विविध छटा असणाऱ्या १० ठिकाणांची भ्रमंती केली. वेगळा दृष्टीकोन ठेवल्यामुळे लेखक त्या भ्रमंतीत अनपेक्षितपणे रमला. त्याच भ्रमंतीचं नवी दृष्टी देणारं, हे खुसखुशीतपणे रंगवलेलं अनुभवकथन वाचायलाच हवं! या भ्रमंतीतील काही ठिकाणं अगदी नेहमीचीच होती तर काही वेगळ्या वाटेवरची ! अशा या वैविध्यपूर्ण ठिकाणांमध्ये दक्षिण भारतातली मंदिरं, सात दिवसात आटोपलेली युरोप टूर, कबीर संगीत गाणाNया कलाकारांसोबतची यात्रा, थरच्या वाळवंटातील उंटावरची थरारक राइड, हजारो भाविकांसोबत अनुभवलेली वारी, उझबेकिस्तानमधील सेक्स टुरिझमचा बाजार अशा हटके ठिकाणांचा समावेश आहे. साहस, वासना, कुतूहल आणि अगदी ईश्वरभक्तीपर्यंतचा अनुभव कधी उपरोधिक, तर कधी खट्याळ शैलीत वाचायला मिळतो. लेखकाच्या निरिक्षणक्षमतेमुळे हे सगळे अनुभव आपल्यापर्यंत जिवंतपणे पोहोचतात. ‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन... अर्थात ‘मदुराई ते उझबेकिस्तान !’

Be the first to review


Add a review