Loading

Sherlock Holmes chya Chaturya Katha

शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा

Author : Sir Arthur Conana Doyle, Trans Dilip Chaware (सर आर्थर कॉनन डॉयल, अनुवाद - दिलीप चावरे)

Price: 150  ₹120

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9789386401441
Publisher : Diamond Publications
Published on : 2018
Binding type : Paperback
Edition : 1
Language : Marathi
Rating :

मी जमिनीवर ठेवलेला दिवा अजून तिथंच होता. त्याच्या प्रकाशामध्ये मला ते काळं छत हळूहळू गचके खात माझ्या अंगावर येताना दिसत होतं. मला पक्कं माहीत होतं की, मिनिटभरातच ते छत माझ्यावर इतक्या प्रचंड शक्तीने आदळणार आहे की, माझा पूर्ण चेंदामेंदा होणार आहे. मी किंचाळत, ओरडत दार ठोठावायला लागलो. आता छत माझ्यापासून केवळ एक किंवा दोन फूट दूर राहिलं होतं. मी शेवटची नजर वेगाने इकडेतिकडे फिरवत असताना मला दोन फळ्यांध्ये पिवळ्या प्रकाशाची एक बारीक रेघ दिसली. दुसर्याच क्षणी मी त्या फळ्यांवर झडप घालून बाहेर पडलो. माझ्यापाठीमागे दिव्याचा चक्काचूर होतानाचा आणि धातूच्या दोन तुळया एकमेकांवर आपटल्याचा आवाज ऐकून मी किती थोडक्यात बचावलो होतो ते मला समजलं. शेरलॉक होम्सच्या इतर कथांप्रमाणेच या कथाही आपली उत्कंठा शिगेला नेतात. रहस्यातली गुंतागुंत, त्याची वातावरणनिर्मिती आणि त्याची उकल करण्याची कॉनन डॉयल यांची खास शैली यांमुळे या कथा आणखी खुमासदार होतात आणि खिळवून ठेवतात.

Be the first to review


Add a review