Loading

Janani : Mother, Daughter, Motherhood

जननी : माता, कन्या, मात्रुत्व

Author : Rinki Bhattacharya (रिंकी भट्टाचार्य, अनुवाद :सुधा नरवणे)

Price: 250  ₹200

Discount: 20%

Avilability: In stock

ISBN : 9788189959678
Publisher : Diamond Publications
Published on :
Binding type : Paperback
Edition : 0
Language : Marathi
Rating :

प्रख्यात लेखिका, शैक्षणिक कार्यातील व्यक्तिमत्त्वे, कलाकार, विदुषी अशा विविध क्षेत्रांतील स्त्रियांनी लिहिलेली आत्मकथने आणि त्याबरोबरच आई म्हणून, कन्या म्हणून, किंवा दोघींचे एकत्रित अनुभवकथन येथे पाहावयास मिळेल. यातील कथनामध्ये पूर्वकाळातील स्मृती आणि घराविषयीची हुरहूर, ओढ या गोष्टी विस्ताराने आढळतील अर्थात् प्रत्येक कथन हृदयस्पर्शी आणि कमालीचे आव्हानात्मक ठरलेले आहे. ह्या संग्रहाच्या लेखिका आपले सार्वजनिक जीवनातले स्थान विसरून अगदी आपल्या हृदयात दडलेल्या, माणुसकीने परिपूर्ण अशा आठवणी आपल्यापुढे उलगडतात. ह्या कथनांत स्वीकृत माता, सावत्र माता आणि केवळ माता ह्यांच्या हकिगती आहेत. एका बाजूला, गर्भपाताचे हृदय पिळवटून टाकणारे कथन अचानक आपल्या समोर येईल तर दुसर्‍या अंगी मी काही केल्या आई होणार नाही अशी एखाद्या महिलेने केलेली निवड वा एखाद्या महिलेचा निश्‍चय इथे पाहावयास मिळेल. मातृत्वाच्या संपूर्ण भाव-भावनांचे, सुखदु:खांचे, तजेलदार, चमकदार वर्णन करणार्‍या कथा इथे आपणांस वाचावयास मिळतील. अत्यंत वाचनीय अशा ह्या संग्रहात मोठेच भावनात्मक आवाहन आहे - केवळ माता आणि मुली ह्यांच्यासाठीच नाही तर पिता आणि पुत्र ह्यांच्यासाठीही... थोडक्यात मानवी नात्यांच्या दुर्मिळ देणगीची स्तुतिस्तोत्रे गाणार्‍या सर्वांसाठीच....

Be the first to review


Add a review